अविरत झुंज
तिचं नाव
सावित्री. समुद्रकिनाऱ्यालगत वसलेलं तिचं गाव. कष्टांविना तिचा दिवस मावळला, असं कधी झालंच नाही. दिवस उजाडल्यापासून
निजेपर्यंत केवळ कष्ट आणि कष्ट करणेच तिच्या नशिबी होते. निजताना स्वतःच्या तर
नाहीच पण निदान लेकरांच्या पोटात तरी दोन घास राहतील याची शाश्वतीही नव्हती. हसणे,
आनंदी राहणे यांसारख्या गोष्टींपासून ती कोसो दूर होती. पण
म्हणून तिने परिस्थितीपुढे नांगी टाकलेली नव्हती. संकटांना सामोरे जाऊन प्रतिकूल
परिस्थितीवर मात करण्याची जिद्द तिच्यात होती. कदाचित या जिद्दीनेच तिला जीवन
जगण्याची प्रेरणा दिली.
तिच्या कष्टांत आणखी भर
म्हणजे तिचा दारुडा नवरा. चोवीस तास दारूत झिंगलेला. रोज तो व त्याच्यासारखेच
त्याचे काही व्यसनी मित्र त्याच्या घरी जमायचे आणि रात्री उशिरापर्यंत त्यांचे हे 'स्नेहसंमेलन' चालू राहायचे. तिच्या नवऱ्याला
एकच काम माहित होते : 'ओली पार्टी'. त्यामुळे तिच्या ऐतखाऊ नवऱ्याचा व संपूर्ण कुटुंबाच्या पोषणाचा भार
तिच्या एकटीच्याच खांद्यावर. सकाळी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन ती मासे पकडायची आणि
बाजारपेठेत विकायला न्यायची. पुरेसे मासे विकल्या गेले तर ठीक नाहीतर उपाशी
राहायची वेळ यायची.
थकली-भागलेली ती संध्याकाळी
उशिरा घरी परतायची. तिच्या भरवशावर घरची चूल पेटायची. मासे विकून मिळालेल्या
पैशांतील काही पैशांची ती बचत करायची. नवऱ्याचा दारूचा शौकही तिच्याच पैशांतून
चालायचा. तिची पैसे देण्याची इच्छा नसूनही नवऱ्याच्या अत्याचारामुळे तिला
नाईलाजाने पैसे द्यावे लागत. एखाद्या वेळेस पैसे देण्यास तिने नकार दिला तर
नवऱ्याकडून मारहाण आणि शिव्यांचा भडीमार केला जायचा. नवऱ्याच्या व्यसनापायी अनेकदा
त्यांना उपाशीपोटीच झोपावे लागे. नवऱ्याने काही काम करून तिला हातभार लावावा असे
तिला वाटू लागले होते. ती नवऱ्याला म्हणायची, "तुम्ही
काही कामधंदा काहून नाही करत ? म्या वाचवून ठेवलेले सारे
पैशे तुम्ही दारूत घालविता अन् तुमच्या दारूपायी म्हायी लेकरं उपाशी झोपतात.
म्हायी नाहीतर निदान पोराईची तरी काळजी करा." पण तिच्या निर्दयी नवऱ्यावर
काहीएक परिणाम व्हायचा नाही. त्यांची परिस्थिती 'जैसे थे'.
असेच
एकदा मासे पकडायला गेली असताना ती विचार करू लागली, "अशीच गत राह्यली तर पुढं कसं व्हईन ? म्या जरी
बुकं शिकले नाई तरी मले लेकराईले शिकवायचं हाये. शिकवून मोठ्ठा सायेब बनवायचं
हाये. ते जर शिकले न्हाई तर आज जशी म्हाई स्थिती आहे तशीच तेईची पण व्हईन...नाय,
नाय, काही झाले तरी म्या लेकराईले
शिकवणार." आणि ती नवऱ्याच्या व्यसनाला आवर कसा घालावा याबाबत विचार करू
लागली. आता जर काही केले नाही तर वेळ हातून चालली जाईल. मुलांच्या भवितव्याबद्दल
तिला हुरहुर वाटू लागली. नवऱ्याला विरोध करण्यासाठी ती सामर्थ्य एकवटू लागली आणि तेवढ्यातच
तिला तो प्रसंग आठवला.
पहिल्या अपत्याच्या वेळी सासरच्यांनी तिची गर्भलिंग निदान चाचणी करवून घेतली. होणारे अपत्य हे 'मुलगी' असल्याचे त्यांना त्यातून कळले. तेव्हा त्यांनी गर्भपात करण्यासाठी तिच्यावर खूप दबाव टाकला. त्यांना मुलगी नको होती. त्यांना 'कुलदीपक' हवा होता. समाजात स्त्रीला कायम दुय्यम स्थान का दिले जाते, हा प्रश्न तेव्हा तिला भेडसावू लागला. लक्ष्मी, दुर्गा, भवानी या देवींची भक्ती करणारा, त्यांची पूजा करणारा आणि त्यांच्या दर्शनासाठी मंदिरात रांगांच्या रांगा लावणारा (एका अर्थाने स्त्रीला उच्च दर्जा देणारा) हाच समाज कन्याजन्माच्या वेळी मात्र त्यांना मारून टाकण्याची भाषा बोलतो, या विसंगतीने तिला विचार करण्यास प्रवृत्त केले. शेवटी सावित्रीने काही झाले मुलीला जन्म द्यायचा निर्णय घेतलाच. तिने सासरच्यांना ठणकावून सांगितले की मी असे पाप मुळीच होवू देणार नाही आणि तिने सर्वांचा विरोध पत्करून मुलीला जन्म देण्याचे धाडस केले. तिच्यापुढे सासरच्यांचे काहीएक चालले नाही आणि त्यांनीसुद्धा हात टेकले.
या प्रसंगामुळे तिला एकदम स्फुरण चढले. या परिस्थितीला सामोरे जाऊन झुंज देण्याचा तिने निर्धार केला. लेकरांना खूप शिकवून मोठे करण्याचा तिने ध्यास धरला. कालांतराने नवऱ्याला पैसे देणे तीने बंद केले. त्यामुळे साहजिकच त्याची व्यसनाधीनता थोडीफार कमी होत गेली. नवऱ्याच्या संस्कारांचा मुलांवर प्रभाव पडू दिला नाही. त्यांना नेहमी त्याच्यापासून दो हात दूरच ठेवले. ती स्वतः जरी अशिक्षित असली तरी तिने शिक्षणाचे महत्व ओळखले होते. केवळ ज्ञानच आपल्याला आपला हक्क मिळवून देतो, हा विचार तिने तिच्या मुलांच्या मनावरही बिंबवला. मुलांच्या शिक्षणाकरिता पैसे कमी पडू नयेत म्हणून ती अन्य काही कामेही करू लागली. तिने शिवणकाम सुरु केले. "किती बी त्रास झाला तर चालंल पन लेकराईच्या शिक्षणाले एक पैका बी कमी नाही पडला पाहिजे" असा तिचा आग्रह होता. मुलांनादेखील तिच्या कष्टांची जाण होती. त्यामुळे मुलांनीदेखील तिचे स्वप्न साकार केले. घरच्यांचा विरोध पत्करून तिने ज्या मुलीला जन्म दिला होता तिने कलेक्टर होवून तिची मान उंचावली. तर तिचा मुलगाही मोठ्या पदावर नोकरीस लागला. तिच्या मुलांनी तिच्या श्रमांचे चीज केले.
एका सत्कार समारंभात सावित्रीची मुलगी म्हणाली, "माझ्या आईने आयुष्यातील समस्यांपुढे हतबल न होता ती निर्भयतेने त्यांना सामोरे गेली. तिने संकटांशी अविरतपणे एकाकी झुंज दिली आणि त्यात ती यशस्वीदेखील झाली. तिच्यापुढे अडचणींचा काहीएक निभाव लागला नाही. स्त्री ही अबला नसून ती आपल्या कर्तृत्वाने कोणतेही ध्येय गाठू शकते हे तिने जगाला दाखवून दिले आहे. ती आमच्यासाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. आज मी जिथे कुठे आहे ते केवळ तिच्यामुळेच. त्यामुळे मी देवाची शतशः आभारी आहे की त्याने मला अशी आई दिली." मुलीचे आपल्याबद्दलचे हे गौरवोद्गार ऐकून सावित्रीचे डोळे पाणावले. आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.

• विश्वजीत
दीपक गुडधे,
वर्ग :- ११ वा
१९, विदर्भ हाऊसिंग कॉलोनी,
मालटेकडी जवळ,
अमरावती.
संपर्क :- ०७२१-२५५००१६, ९४०३८४०१०९.
================================ वर्ग :- ११ वा
१९, विदर्भ हाऊसिंग कॉलोनी,
मालटेकडी जवळ,
अमरावती.
संपर्क :- ०७२१-२५५००१६, ९४०३८४०१०९.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा