गौरीनंदन
घरोघरी वाजतगाजत
अवतरले गौरीनंदन
• विश्वजीत दीपक गुडधे,
घरोघरी वाजतगाजत
अवतरले गौरीनंदन
विघ्नहर्त्या विनायका तुला
आम्ही वंदितो सर्वप्रथम
सकल कलांचा अधिपती
प्रिय तुजला मोदक फार
धडा शिकविसी तू दुष्टांना
मुषकावर होऊनी स्वार
गणेशोत्सवाचा साऱ्यांवर
असा काही चढलाय रंग
गजानना तुझ्या भक्तीत
आबालवृद्ध जाहले दंग
आनंदा आले उधाण भारी
तुझ्या आगमनाने मोरया
निरोप समयी गाती सारे
'पुढल्या वर्षी लवकर या'
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
शिक्षक

'शि'ल, 'क्ष'मा आणि 'क'रुणेचा
अखंड झरा आहे शिक्षक
समस्त जगाचे ज्ञान आहे
त्याच्या चरणी नतमस्तक
साधी राहणी, उच्च विचार
त्याच्या जीवनाचे असे सूत्र
ज्ञानदान हेचि कार्य त्याचे
त्यास्तव झटतो अहोरात्र
वाव देई तो सुप्तगुणांना,
नवचेतनांना पाठबळ
गगनभरारी घ्याया देई
पाखरांच्या पंखांमध्ये बळ
शिक्षकच असतो सदैव
अवघ्या पिढीचा शिल्पकार
विश्वात आईच्या उपरांत
दुसऱ्या स्थानाचा हक्कदार
ई-लर्निंगचे हे युग तरी
शिक्षकांविना नाही पर्याय
संस्कारांचे बीज रोवायला
यंत्र कामी पडतील काय ?
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
माझ्या पाऊलखुणा
(देवाचे मनोगत)

माझी वस्ती तर नाही या माणसांत
मी तर विकल्या जातो या दुकानांत
विश्व निर्मिले मी हातांनी
मातीने नाही भावनांनी
भटकतोय मी शोधत...
माझ्या पाऊलखुणा आहेत कुठे ?
माझ्या पाऊलखुणा आहेत कुठे ?
तुझीच छाया होवून राहिलो मी तुझ्यासंगे
उन्हात सावली होवून राहिलो मी तुझ्यासंगे
वाटेवर चालताना जरी मी राहिलो तुझ्या सख्यासारखा
गुरफटला आहेस तरी तू जाळ्यांमध्ये
प्रश्न शोधतो आहेस तू उत्तरांमध्ये
हरवला आहेस तू कुठे ?
माझ्या पाऊलखुणा आहेत कुठे ?
माझ्या पाऊलखुणा आहेत कुठे ?
माझ्यातूनच आले हे पक्षी, हे वाहते पाणी
भूमीपासून अंबरापर्यंत माझीच कहाणी
तू सुद्धा आहे माझ्यातून आलेला
तरी शोधतो तू का इथे मला ?
माझ्यातूनच आले आहे प्रारब्ध
श्वासांनी भरलेले आहे हे चित्र
तरी का आहेस तू निरुत्तर ?
माझ्या पाऊलखुणा आहेत कुठे ?
माझ्या पाऊलखुणा आहेत कुठे ?
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
[ "ओ माय गॉड" या अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या चित्रपटातील "मेरे निशान" या गाण्याचा स्वैर अनुवाद...
गीतकार : कुमार
गायक : कैलाश खेर
गाण्याची लिंक : http://www.youtube.com/watch?v=a1mpK2LA9Rw ]
================================================================
दंश करती अहीच्या फणासारखे
घाव हृदयास घाली घणासारखे
राहिल्या ना कुठे आत संवेदना
आचरण दानवांच्या गणासारखे
ना कळे केवढे प्राण अनमोल ते
छाटती कैक लोका तणासारखे
शत्रुतेच्या समुद्रात आत्मीयता
वितळते साखरेच्या कणासारखे
'विश्वजित' तू उगा राखली शांतता
भांडते आज जग हे रणासारखे
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
ओवाळीते भाऊराया
सर्व सणांहूनी प्रिय मजला, रक्षाबंधनाचा हा सण
राखी बांधून मनगटी, करिते भाऊरायाचे औक्षण
द्रौपदीच्या कृष्णासम भाऊ माझा, हेच माझे अहोभाग्य
वचन दे मला, उभा राहशील माझ्या पाठीशी तू नित्य
बहिण-भावाच्या पवित्र नात्याचे, ही राखी आहे प्रतिक
मजबूत हे बंध एवढे, जे न तुटायचे प्राणांतिक
प्रगती कर इतकी, ज्यापुढे गगनही होईल खुजे
लाभो तुजला सुखसमृद्धी, याहून नाही मागणे दुजे
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.================================================================
रक्त आपले असो किंवा त्यांचे,
ते मानवी रक्तच असते शेवटी.
युद्ध पूर्वेत चालू असो व पश्चिमेत,
गळा शांततेचाच घोटला जातो शेवटी.
बॉम्ब घरांवर पडो अथवा सीमेवर,
जीवनाचा आत्माच जखमी होतो शेवटी.
पीक आपले जळो किंवा त्यांचे,
दुष्काळाने माणूसच मारला जातो शेवटी.
रणगाडे पुढे वळतील किंवा मागे,
वांझ तर पृथ्वीच होते शेवटी.
तो विजयाचा जल्लोष असो वा पराभवाचा शोक,
जीवन मृत्यूवर अश्रूच गाळते शेवटी.
युद्ध तर स्वतःच आहे एक समस्या,
मग ते कसे होईल समस्यांवरील उपाय.
संगे घेऊन येते आग आणि रक्त,
मागे सोडून जाते फक्त विनाश आणि विनाश.
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
अमरावती.
================================================================
आव्हान
खाचखळग्यांनी भरलेली या जीवनाची वाट
इथे कधी दुःखांची रात, कधी सुखांची पहाट
मानू नको हार आताशा, सारे स्थिरावेल पुन्हा ||१||
स्वार्थापुरते सोबती संकटात होती परके
पलायन करी समोर दिसताच ठेच-धक्के
खऱ्या मित्राचाच हात, देई सुखदुःखात साथ ||२||
यशापयशाची जीवनात चालूच राही ये-जा
थोड्याशा अपयशाने का करावी जीवास इजा ?
अपयश शिकवी धडा, बळ देई देण्या लढा ||३||
संकटे लाख तरी मुखी नको निराशेचे नाव
काळाच्या ओघात भरून निघतील सारे घाव
मानू नको हार आताशा, सारे स्थिरावेल पुन्हा ||४||
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
अमरावती.
================================================================
गणेशवंदना
गणेशवंदना
गणराया तुझे विशाल मस्तक
विस्तृत विचारांचे असे सूचक
गजानना तुझे इवलेसे नयन
सूक्ष्म निरीक्षणाचे असे लक्षण
संदेश तुझ्या सुपासारख्या कानांचा
'मी'पणा सोडून, इतरांचेही ऐकण्याचा
विनायका तुझी भव्य सोंड देते
आम्हा नम्रता अन सामर्थ्याचे धडे
तुझे छोटेसे मुख आम्हा सांगे
नका बनू कधी बोलघेवडे
हातातील कुऱ्हाड गणेशा तुझ्या
तोडून टाकी सर्व मोहाच्या बेड्या
गौरीसुता तुझ्या हातातील दोरी
भक्तांना ध्येय गाठण्या मदत करी
एकदंता तुझ्या हातातील मोदक
असे कठोर साधनेचे फळ मोहक
देई सामर्थ्य तुझे विशाल पोट
शांततेने पचविण्या बरे-वाईट
एक पाय खाली, एक असे वर
भक्तोद्धारासाठी तू सदा तत्पर
करितो निर्देश तुझ्या चरणीचा मूषक
नियंत्रणाबाहेरील इच्छा करिते नाश
करतात सेवा तुझी रिद्धी-सिद्धी
वक्रतुंडा, लाभू दे सर्वांना सद्बुद्धी
चिंतामणीच्या चरणी एकच प्रार्थना
पूर्ण होवो चराचराची मनोकामना
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
बॉम्बस्फोट
अतिरेकी करत होते
एकामागून एक आघात
आम्ही मात्र बसलो होतो
हातावर ठेवून हात
कित्येक निष्पापांनी
गमविले आपले प्राण
आम्हाला मात्र अजूनही
नाही आले त्याचे भान
लाखो झाले बेघर अन्
असंख्य झाले पोरके
त्यांना मदतनिधी देवून
मोकळे झाले म्होरके
फाजील आश्वासनांवर
भाळणे सोडून द्या आता
न्यायाचा हक्क आपुला
त्यासाठी पेटून उठावे आता
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
अमरावती.
================================================================
पावसाच्या सरी
अवचित बरसतो
तन -मन भिजवितो
अवनीला गंधाळतो
तुझी निराळीच तऱ्हा ||१||
प्रफुल्लीत होती फुले
खळाळती ओढे-नाले
हर्षात नाचती मुले
तुझी निराळीच तऱ्हा ||२||
धुंद करी जलधारा
सळसळ वाहे वारा
बर्फाच्या बरसे गारा
तुझी निराळीच तऱ्हा ||३||
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
अमरावती.
================================================================
कधी कधी
वाटे मनास तैसे करतो कधी कधी
नेईल वाट तिकडे वळतो कधी कधी
वर्षाव हा सुखांचा ना भावतो मला
दुःखांतही अता मी रमतो कधी कधी
इतरांचं दुःख देई पीडा मला बहुत
मी हास्य दुःखितांचे बनतो कधी कधी
कामास ना मिळे येथे दाम नेहमी
श्रमिकच इथे उपाशी मरतो कधी कधी
विश्वात या हरेकाची वेगळी तऱ्हा
हा खेळ बाहुल्यांचा बघतो कधी कधी
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
( जफर गोरखपुरी यांच्या "तो मुझे खत लिखना" या रचनेचा स्वैर भावानुवाद )
पत्र लिहशील मला
छळेल माझी याद जेव्हा, पत्र लिहशील मला
उडेल तुझी झोप जेव्हा, पत्र लिहशील मला
नील तरूंच्या निबिड छायेतला हसरा श्रावण
तृषित अवनीला कवेत घेण्या आतुरलेला श्रावण
अख्खी रात्र छतावरती अखंड बरसणारा श्रावण
हृदयी जेव्हा भडकेल ज्वाला, पत्र लिहशील मला
अवचित एखाद्या फांदीवरचे पान फडफडेल
सहवासातील एखादा क्षण तुला गुद्गुदेल
आठवनौका माझी तुजला व्याकूळ करेल
जीवास आग लागेल जेव्हा, पत्र लिहशील मला
पाहण्यालायक जेव्हा नसेल काही नजरेला
चंद्रही जाईल जेव्हा मेघांच्या आडोशाला
स्वजन होती परके जेव्हा, पत्र लिहशील मला
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.================================================================
मनासारखे झाले तर...

मनासारखे झाले तर
किती किती मजा येईल
मनाला वाटेल ते सारे
प्रत्यक्ष करता येईल
रंगीबेरंगी पक्ष्यांसंगे
आकाशी भरारी घेणार
लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या
जगाची सैर करणार
माझ्या प्रिय चांदोमामाची
एकदा घेईल मी भेट
तेजाचे रहस्य जाणण्या
जाईल सुर्यापाशी थेट
स्वप्नातल्या परीकडून
मी जादूची छडी घेईल
तो गोलगोल फिरवून
सर्व इच्छा पूर्ण करील
'मनासारखे झाले तर'
कल्पनेने मी आनंदतो
मनासारखे व्हावे अशी
नेहमी आशा बाळगतो
तो वाट पाहतोय...
================================================================
================================================================

मनासारखे झाले तर
किती किती मजा येईल
मनाला वाटेल ते सारे
प्रत्यक्ष करता येईल
रंगीबेरंगी पक्ष्यांसंगे
आकाशी भरारी घेणार
लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या
जगाची सैर करणार
माझ्या प्रिय चांदोमामाची
एकदा घेईल मी भेट
तेजाचे रहस्य जाणण्या
जाईल सुर्यापाशी थेट
स्वप्नातल्या परीकडून
मी जादूची छडी घेईल
तो गोलगोल फिरवून
सर्व इच्छा पूर्ण करील
'मनासारखे झाले तर'
कल्पनेने मी आनंदतो
मनासारखे व्हावे अशी
नेहमी आशा बाळगतो
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
काऊंट डाऊन
त्याच्या आयुष्यात
नेहमीचंच झालंय
दिवसभर उन्हातान्हात
कष्ट करणे,
कोदे उपसणे
आणि तरीही
भाकरीच्या एका तुकड्यासाठी
चाचपडणे...
तो वाट पाहतोय...
दुःखांच्या मेघांचे सावट
दूर होण्याची आणि
सुखांचं काऊंट डाऊन सुरु होण्याची...
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
अमरावती.
================================================================
आम्हा शेतकऱ्यांवरी
सदा रुसला पाऊस
कसा पिकवू कापूस
पाण्याविना ||१||
कष्ट करून करून
झाली या हाडांची झीज
कधी होईल हो चीज
प्रयत्नांचे ||२||
वावरात गाळतो मी
माझ्या रक्ताचाही घाम
कधी मिळणार दाम
श्रमांना या ||३||
लेक शिकावी म्हणून
घर ठेवलं गहाण
नाही पायात वहाण
कधी माझ्या ||४||
आम्हासाठीच्या योजना
नेत्यांच्या पोटात जाई
माझे पोट मात्र राही
उपाशीच ||५||
कधी होईल माझी या
दुःखांपासून सुटका
मिळेल दोन घटका
सुख थोडे ||६||
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
अमरावती.
================================================================
जागर
लोकांस आता जागवा पुन्हा
विझल्या मशाली पेटवा पुन्हा
डोक्यास टाळे लावती सदा
सुस्तांस साऱ्या चेतवा पुन्हा
आजन्म सोसे बापुडा इथे
सोशीक लोकां जागवा पुन्हा
झोपून कैसे चालणार हो ?
बळ आपलेही दाखवा पुन्हा
संधी न येणे विश्वजित अशी
संदेश माझा पोचवा पुन्हा
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
अमरावती.
================================================================
बरी माझी झोपडी
भव्यदिव्य असा हा बंगला
लाखो-करोडोंनी तो बांधला
इथं एसीत श्वास कोंडला
याहून बरी माझी झोपडी ||१||
सुखसोयींची आरास असे
आणि खोल्यांची पैदास दिसे
पण त्याला घरपण नसे
याहून बरी माझी झोपडी ||२||
नाही कुठे नात्यांची गुंफण
सारे आपापल्यातच मग्न
माणसां सिमेंटचे कुंपण
याहून बरी माझी झोपडी ||३||
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.================================================================
झाडाचे मनोगत
ज्याला जे हवे ते मी
आजपर्यंत देतच आलो
फळाची अपेक्षा न करता
सढळ हातांनी देतच गेलो
अंगाखांद्यावर खेळणाऱ्या
पाखरांस दिली मी माया
तर रणरणत्या उन्हाने
तापलेल्या पथिकास छाया
जीवन सुकर करण्यास
देतो बहुपयोगी लाकूड
औषधे, सुवासिक फुले
आणि फळे गोड गोड
थोडा स्वतःबद्दल विचार
करताना मला असे वाटले
इतरांसाठी राबता राबता
माझे जगणेच बाकी राहिले
पण मी म्हणालो स्वतःलाच
"मनास वाटू नको देऊ शल्य
कारण इतरांच्या सेवेतच
आहे तुझे जीवितसाफल्य"
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.================================================================
नेता की अभिनेता ?
लई नाटकी नाटकी
या देशामधला नेता
मतलबापायी होतो
घडीघडी अभिनेता
झोपडीतल्या दीनाची
त्याला येई ना कदर
पण खुर्चीसाठी खातो
गरीबासंगे भाकर
तसे तर खुर्चीदास
सदा एसीतच राहे
पण मतासाठी मात्र
डोईवर भार वाहे
पैशांशीच देणे-घेणे
विकासाला मारी लाता
परि भाषणात त्यांच्या
करी विकासाच्या बाता
आपल्या छाताडावर
उड्या मारती हे मस्त
डोळ्यावरले झापड
काढा, राहू नका सुस्त
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
अमरावती.
================================================================
जिद्द
सश्यासोबत शर्यतीत
मंदगतीने धावणारा कासव,
अनेकदा पडूनही
भिंतीवर चढणारा किडा,
बल्बचा शोध लावताना
हजारदा चुकणारा एडिसन,
रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्रे
विकणारे अब्दुल कलाम,
मोटार गॅरेजमध्ये
नोकरी करणारे गुलजार,
फुटपाथवर सिनेमाची पोस्टर्स
रंगविणारे हुसेन
किंवा
खाटिकखान्यात नोकरी
करणारा शेक्सपिअर...
या सर्वांच्या मुखी
एकच वाक्य होते...
"जिद्द आहे जिंकण्याची"
आणि या जिद्दीनेच
ते झाले यशस्वी...
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
हास्य
जीवन आहे सुंदर
सोडा रडण्याची रीत
मनी फुलवा रे प्रीत
आनंदाची ||१||
जरी दुःखाचा डोंगर
तरी नसावे नैराश्य
चेहऱ्यावरती हास्य
असू द्यावे ||२||
संकटांना तोंड द्यावे
सदा हसत हसत
नका बसू रे कोसत
नशिबाला ||३||
हास्य देईल सर्वांना
तणावांपासून मुक्ती
जीवन जगाया शक्ती
देत असे ||४||
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
मी महाराष्ट्र बोलतोय...
शिवछत्रपतींच्या तलवारीच्या
प्रत्येक वारातून...
गलबलणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या
सिंहगर्जनेतून...
कृष्णा, तापी, गोदावरीच्या
खळखळणाऱ्या पाण्यामधून...
शिवनेरी, पन्हाळा आणि प्रतापगडाच्या
कडकडणाऱ्या तोफांमधून...
अजिंठा आणि वेरूळच्या
भव्य लेण्यांतून...
ज्ञानेश्वर, तुकोबा आणि एकनाथाच्या
मधुर वाणीतून...
अतिरेक्यांच्या गोळ्यांचा वर्षाव झेलणाऱ्या
मुंबईच्या काळजातून...
अख्खं आयुष्य शेतात राबणाऱ्या
शेतकऱ्याच्या घामातून...
शेतात आनंदाने डोलणाऱ्या
पिकांमधून...
खाशाबा जाधवांच्या आणि
सचिनच्या विक्रमांमधून...
माशेलकर आणि विजय भटकर
यांच्या संशोधनातून...
माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या
सैनिकाच्या रक्तातून...
या भूमीतील गरीबाच्या
चटणी आणि भाकरीतून...
आणि
या मातीच्या प्रत्येक
कणाकणातून...
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
तहानलेल्या कावळ्याची गोष्ट
एके दिवशी कावळ्याला लागली भारी तहान
पाण्याच्या शोधात त्याने धुंडाळले सारे रान
"पाणी, पाणी" म्हणून त्याने केला आरडाओरडा
पाण्याविना त्याचा घसा झाला कोरडा
पाण्यासाठी त्याने शोधल्या दाहीदिशा
हळूहळू त्याची सुटत चालली होती आशा
अचानक त्याला दिसला एक माठ दूरवर
कावळ्यास दिसले त्यात, पाणी थंडगार
पाणी पाहून कावळ्याला फार आनंद झाला
पण बघतो तं काय, "पाणी होते तळाला"
चोच कावळ्याची, तळाशी काही पोचेना
''पाणी कसे प्यावे ?", त्याला काही सुचेना
हुशार कावळ्याने चालविली आपली अक्कल
पाणी वर आणण्याची, त्याला सुचली शक्कल
माठात दगड टाकले, कावळ्याने पटापट
वर आलेले पाणी, प्याले त्याने गटागट
पाणी पिऊन कावळा झाला, अगदी टवटवीत
आणि भरकन उडून गेला खुशीत
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
तुझी आठवण येते रे देवा
भक्त झाला दुर्बळ, तुझी आठवण येते रे देवा
या भक्तांना तारण्यास, आता तूच अवतार घ्यावा
रावणांच्या भरतीने झाली, अयोध्येची लंका आता
दुष्टांचा संहार करण्यास, घे तू रामजन्म आता
रक्षकच झालेत भक्षक, शेतास खाते कुंपण
कंसांना या धडा शिकवण्या, हवा इथे एक कृष्ण
क्षुल्लक कारणांवरून, इथे रोजच होते युद्ध
जगाला शांतीचा संदेश देण्या, तू हो गौतम बुद्ध
कुणी जरा काही बोलले की, आम्ही होतो हिंस्त्र पशू
यमदुतांनाही माफ करण्या, होशील का तू येशू ?
गोठले आमचे रक्त, संपलीय प्रतिकार शक्ती
दुःखास हरण्या देवा, तुझ्या आगमनाची आसक्ती
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
आयपीएलचा बाजार

रटाळ कसोटी खेळून
खेळाडू कंटाळले बुवा
म्हणाले आयपीएल खेळा
अन् झटपट पैसे कमवा

देशाच्या दौऱ्यांच्या वेळेस
घेता येईल ना विश्रांती
वर्षातून एकदाच भेटते
कुबेराएवढी संपत्ती

नाही करणार नेट्समध्ये
आता तासनतास सराव
अंधाधुंद फटकेबाजीनेच
होतो पैशांचा वर्षाव

दिसेल फाटक्या कपड्यांतील
चीअर लीडर्सचा धिंगाणा
सामना झाल्यावर खेळाडू म्हणे
"जरा बीअर आणा"

जाहला क्रिकेट बाजार
झाल्याने पैशांचा शिरकाव
धनाच्या या बाजारात झाला
रनदांडग्या कोंबड्यांचा लिलाव
================================================================
घे जरा विसावा

अजून किती काळ, अखंड धावशील मानवा
दमला असशील ना तू ? घे जरा विसावा
मार्कांच्या शर्यतीत, हरवलेस अवघे बालपण
विटी-दांडू, कबड्डीचे, ऐकिवात नव्हते नावपण
नोकरीच्या शोधात, भटकली तुझी तरुणाई
मोठाले पॅकेज घेऊन, करायची होती कमाई
गाडी तुझ्या संसाराची, आली जेव्हा रुळावर
येऊन ठेपला तुजवर, कुटुंबाच्या पोषणाचा भार
आयुष्याची सायंकाळ, हाती विठोबाची माळ
घे जरा विसावा, थांबव तुझी ही धावपळ
परीक्षा

म्हणे त्यांच्याकडे बडी हुशारी होती
ती तर पाठांतराची ओकारी होती
कागदावरच त्यांनी फोडल्या डरकाळ्या
पेच येता ती टोळी पळणारी होती
इतिहासात पेटविली क्रांतीची मशाल
संकट येता ; घेतली लाचारी होती
विज्ञानात केलेत अंधश्रद्धांवर वार
त्यांची झुंड तर भोंदूच्या दारी होती
भूगोलात केली त्यांनी जगाची सैर
परि शेजारच्यास न ओळखणारी होती
आयुष्याचे गणित कधी आलेच नाही
तरीपण बरोबर ही गुणाकारी होती (?)
मायभूचे ऋण न जाणले ; झटपट शिकून
त्यांना करायची परदेश वारी होती
सदा शिकले चांगले ; पण वागले उलटच
तरीही त्यांनी घेतली भरारी होती
अनुत्तीर्ण झाले परिक्षेत जीवनाच्या
परि त्यांना मिळाली टक्केवारी होती
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
तिचा जन्म

कळी खुलण्यापुर्वीच
ती अशी खुडली गेली
सख्ख्या मायबापांनीच
केले मृत्युच्या हवाली
का बरे असला रोष
केवळ स्त्रीच्याच पात्री
भुललात ? तीच असे
या जगाची जन्मदात्री
दुर्गा, भवानी, लक्ष्मीचे
करता जंगी पूजन
परि या गृहलक्ष्मीला
दाविता यमसदन
'हवा फक्त मुलगाच'
याचा सोडून द्या आव
मुलीचा जन्म झाल्यास
साजरे करा उत्सव
मुलं असो किंवा मुली
दोन्ही आहेत समान
मुलगा वंशाचा दिवा
मुलगी वंशाची शान
उमलू द्या त्या कळ्यांना
नका कुस्करु ही फुलं
आकाशास गवसण्या
होऊ द्या द्वार हे खुलं
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
आमची शरणागती
रटाळ कसोटी खेळून
खेळाडू कंटाळले बुवा
म्हणाले आयपीएल खेळा
अन् झटपट पैसे कमवा
देशाच्या दौऱ्यांच्या वेळेस
घेता येईल ना विश्रांती
वर्षातून एकदाच भेटते
कुबेराएवढी संपत्ती
नाही करणार नेट्समध्ये
आता तासनतास सराव
अंधाधुंद फटकेबाजीनेच
होतो पैशांचा वर्षाव
दिसेल फाटक्या कपड्यांतील
चीअर लीडर्सचा धिंगाणा
सामना झाल्यावर खेळाडू म्हणे
"जरा बीअर आणा"
जाहला क्रिकेट बाजार
झाल्याने पैशांचा शिरकाव
धनाच्या या बाजारात झाला
रनदांडग्या कोंबड्यांचा लिलाव
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.================================================================
घे जरा विसावा
अजून किती काळ, अखंड धावशील मानवा
दमला असशील ना तू ? घे जरा विसावा
मार्कांच्या शर्यतीत, हरवलेस अवघे बालपण
विटी-दांडू, कबड्डीचे, ऐकिवात नव्हते नावपण
नोकरीच्या शोधात, भटकली तुझी तरुणाई
मोठाले पॅकेज घेऊन, करायची होती कमाई
गाडी तुझ्या संसाराची, आली जेव्हा रुळावर
येऊन ठेपला तुजवर, कुटुंबाच्या पोषणाचा भार
आयुष्याची सायंकाळ, हाती विठोबाची माळ
घे जरा विसावा, थांबव तुझी ही धावपळ
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================परीक्षा
म्हणे त्यांच्याकडे बडी हुशारी होती
ती तर पाठांतराची ओकारी होती
कागदावरच त्यांनी फोडल्या डरकाळ्या
पेच येता ती टोळी पळणारी होती
इतिहासात पेटविली क्रांतीची मशाल
संकट येता ; घेतली लाचारी होती
विज्ञानात केलेत अंधश्रद्धांवर वार
त्यांची झुंड तर भोंदूच्या दारी होती
भूगोलात केली त्यांनी जगाची सैर
परि शेजारच्यास न ओळखणारी होती
आयुष्याचे गणित कधी आलेच नाही
तरीपण बरोबर ही गुणाकारी होती (?)
मायभूचे ऋण न जाणले ; झटपट शिकून
त्यांना करायची परदेश वारी होती
सदा शिकले चांगले ; पण वागले उलटच
तरीही त्यांनी घेतली भरारी होती
अनुत्तीर्ण झाले परिक्षेत जीवनाच्या
परि त्यांना मिळाली टक्केवारी होती
• विश्वजीत दीपक गुडधे,
================================================================

कळी खुलण्यापुर्वीच
ती अशी खुडली गेली
सख्ख्या मायबापांनीच
केले मृत्युच्या हवाली
का बरे असला रोष
केवळ स्त्रीच्याच पात्री
भुललात ? तीच असे
या जगाची जन्मदात्री
दुर्गा, भवानी, लक्ष्मीचे
करता जंगी पूजन
परि या गृहलक्ष्मीला
दाविता यमसदन
'हवा फक्त मुलगाच'
याचा सोडून द्या आव
मुलीचा जन्म झाल्यास
साजरे करा उत्सव
मुलं असो किंवा मुली
दोन्ही आहेत समान
मुलगा वंशाचा दिवा
मुलगी वंशाची शान
उमलू द्या त्या कळ्यांना
नका कुस्करु ही फुलं
आकाशास गवसण्या
होऊ द्या द्वार हे खुलं
• विश्वजीत दीपक गुडधे,
================================================================
आमची शरणागती
देशाचे वाटोळे होताना, मुकाट्याने बघतो आम्ही
कितीही घाव झाले, तरी सहन करतो आम्ही...
पैशांच्या बाजारात, देश विकलाय त्या पुढाऱ्यांनी
तरीही त्यांना मत देण्या, पुढे सरसावतो आम्ही...
'निर्दोष' जनतेच्या प्रेतांचा सडा, पाडला आतंकींनी
त्यांना फाशी सोडून, बिर्याणी खाऊ घालतो आम्ही...
पुस्तकांतील मुल्ये, केवळ रटली पोपटावानी
जीवनात मात्र, ती पाळताना कचरतो आम्ही...
होताना जनतेच्या हालअपेष्टा, घेतो डोळे झाकुनी
'सिस्टीम'ला दोष देण्यास, तयार असतो आम्ही...
काळजात जखम 'विश्वजित'च्या, ही दुर्दशा बघुनी
झुंज देणे सोडून शरणागती पत्करतो आम्ही...
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
सचेत हो भूमिपुत्रा, वाईट स्मृती विसर
तुजसाठीच उजाडलेय हे नवे संवत्सर
उजाळले तुझ्या मनात आनंदाचे लक्षदिवे
इतरांसाठी राखून ठेव सुखाची काही किरणे
राग, लोभ, मत्सराची कुंडी तोडून टाक
स्नेह्कुसुमांनी फुलव ही सुंदर मनबाग
भास्कर देतोय तुजला सामर्थ्याचे बळ
कर प्रयत्न, नाही गेलेली विजयश्रीची वेळ
प्रयत्नांच्या पंखांनी कर स्वप्नांच्या अंबरी सैर
फ़ीनिक्सलाही लाजवणारी घे तू गरुडझेप
अपयशाने खचून करू नको जीवाचा अंत
कारण अपयाशानेच होते यशाची सुरुवात
वात्सल्याने परिपूर्ण कर तुझा हा मनसागर
या किनाऱ्याहून रिती न जावी कोणती घागर
तुझ्या धरत्रीच्या छातीवर शत्रूंच्या संगिनी
शिवबाच्या तलवारीने टाक त्यांची शिरे कापुनी
या भोळ्याभाबड्या जनतेचे करण्या उद्दीपन
सज्ज राहा तू करण्या आपले प्राणही अर्पण
हाणून त्या खुर्चीच्या दलालांच्या पाठीवर बेत
तूच घडवू शकतो पुन्हा एकदा नवभारत
जर नाही जगला आता, सर्वकाही गमावशील
म्हणूनच म्हणतो पेटून उठ, राहू नको गाफील
संदेश हा तुझ्या बांधवाचा स्मरणात ठेवशीन
पुन्हा एकदा करताना नववर्षात 'लॉग इन'
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
होळी घेऊन आला फाल्गुन
आनंदात आम्ही निघालो न्हाऊन
होळीचा हा प्रसन्न ऋतू वसंत
रंगात उधळून निघाला आसमंत
सण असे हा त्यागाचा अन विश्वासाचा
शत्रुता त्यागून मित्रता स्वीकारण्याचा
होळीच्या या तपत्या ज्वाला
नमन करतो आम्ही तिला
काढा पिचकारी, उधळा गुलाल
हिरवा, पिवळा, निळा, लाल
वापरू नका ते रासायनिक रंग
करतील ते होळीचा आनंद बेरंग
रासायनिक रंग घातक त्वचेला
लावतील ग्रहण होळीच्या आनंदाला
रासायनिक रंगांचा आनंद क्षणिक
वापरावे फक्त रंग नैसर्गिक
अर्पण करा होळीला इर्षा-द्वेष
हाच असे होळीचा संदेश
पर्यावरणाचे रक्षण जबाबदारी आपली
साजरी करूया होळी इको-फ्रेंडली
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
भारत व इंडियातील दरी
भारत व इंडियात
निर्माण झालीय दरी
माणसे येथे आहेत
गरीब-श्रीमंतात भेद करणारी ||१||
कुणाकडे असे
राहण्या काचेचा महाल
कुणाचे होत असे
जगण्याचे हाल ||२||
कुणाकडे असे
फिरण्या आलिशान गाडी
कुणी वापरात असे
रोज तीच जुनी, फाटकी साडी ||३||
कुणाच्या जगण्याची
असे राजेशाही ठेवण
कुणाला नशीब होत नसे
दोन वेळेचेही जेवण ||४||
कुणी घेतात
सोन्याचेही पीक
कुणी मागतात
पोट भरण्या दारोदारी भीक ||५||
कुणी कमवितो
पैसे कोटी अन कोटी
कुणी जगतो
दिवसेंदिवस उपाशी पोटी ||६||
कुणी खात असे
रोजच पुरणपोळी
कुणी वाहत असे
खांद्यावरी लाकडाची मोळी ||७||
कुणाच्या असे
घरावर माडी
कुणाला नसे
राहण्या साधी झोपडी ||८||
भ्रष्टाचार करूनही
कुणाच्या मुखावर
कष्ट करूनही
कुणाच्या डोळां सदा असे आसू ||९||
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
प्राशन करून या भारतमातेचे क्षीर
समस्त भारतवासी देती ज्याला धीर
बघता बलिदान ज्याचे दाटते डोळा नीर
तो अमर भारतीय सैनिक वीरांचाही वीर ||१||
दधीचिची ज्याची असे हाडे
रणांगणी पाडी जो रक्ताचे सडे
सज्ज असे जो चारण्या शत्रूस खडे
तो वीर रणावर धारातीर्थी पडे ||२||
देशासाठी मारण्या सज्ज ज्याचा आत्मा
शत्रू पक्षाचा ज्याने केला खात्मा
पाठीशी ज्याच्या टिळक, महात्मा
तो रणांगणी लढता जाहला हुतात्मा ||३||
ज्योतीसम जो जगला जीवन
जिजाऊने केले ज्याचे औक्षण
परि करण्या भारतभुमीचे रक्षण
केले त्या वीराने प्राणही अर्पण ||४||
रणावर ज्याने गाळला रक्ताचा घाम
देशाचे रक्षण ज्याचे असे काम
दिला अन्यायाला विराम
त्या रणवीराला आमचा सलाम ||५||
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
सगळ्या सृष्टीला हसवीत असतो
वृक्षांवरी पसरते लकाकी नवी
चहूकडे पसरते मखमल हिरवी
खळाळतात सगळे नाले-ओढे
आनंदाने डोलतात हिरवी झाडे
बळीराजांची पिकांची प्रतीक्षा संपवी
भारतभूमीस सुजलाम-सुफलाम बनवी
पण जेव्हा पाऊस रुसून बसतो
कितीही विनविल्या बरसत नसतो
पावसाविना पिके जातात करपून
घरातील अन्नधान्य जाते संपून
विहिरी-तळी आटून जातात
गाई-गुरे तडपून मरतात
सर्व चराचर भुकेने व्याकूळ होते
चहूकडे रुक्ष वाळवंट विक्राळ हसते
करण्यास सर्व जीवसृष्टीचे कल्याण
फुंकण्यास सर्व चराचरात प्राण
पावसाने सदा बरसत राहावे
संपूर्ण जगाचे पालनपोषण करावे
आहे ईश्वरचरणी हीच प्रार्थना
पूर्ण होवो चराचराची मनोकामना
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
दारूची नशा
दारूची आहे ही अजब नशा
करिते ही भल्याभल्यांची दुर्दशा
जेव्हा लोक चिंतेने असतात ग्रस्त
तेव्हा दारू पिऊन होतात सुस्त
दारूने झाले कित्येक परिवार बरबाद
तर काही झाले जीवनातून 'बाद‘
नवरा राहतो दिवसरात्र दारूपाशी
मुलं-बाळ मात्र राहतात उपाशी
दारूत नवऱ्याने केला पैसा नष्ट
मग खावं लागलं लोकांचं उष्ट
मद्यपी म्हणून समाजाने मारला शिक्का
बायको- पोरं सोडून गेल्याने बसला धक्का
सरकार म्हणते धान्यापासून दारूनिर्मिती
ही घडवेल मानवाची अधोगती
नसावे कोणतेही जीवन दारूयुक्त
तरच होईल भारत व्यसनमुक्त
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
पैशापुढे नतमस्तक
बघा पैशाची ही अजब नशा
जग घालिते लोटांगण हिच्या पाया
पैशापुढे नाती-गोती झाली लहान
मायावी पैसा बनला सर्वात महान
पैसे खाणाऱ्यांची झाली ख्याती
कष्ट करणाऱ्यांची झाली माती
पैसे खाऊन नेतेमंडळी झाली लाल
गोरगरिबांचे मात्र झाले हाल
पैशासाठी झाले कित्येकांचे अपहरण
पैशामुळे आले कित्येकांना मरण
पैशासाठी विश्वासूंनी केला विश्वासघात
पैशाने घडविले भयानक रक्तपात
असे हे मायावी पैसे दुरीतांकरीताच खरे
आपण मात्र यापासून दूर असलेलेच बरे
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================
तेजस्वी, राष्ट्राभिमानी
जिजाऊचा लाल
शिवबा आमुचा
प्रसाद जगदंबेचा
अवतार शिवाचा
शिवबा आमुचा
सखा मावळ्यांचा
राजा रयतेचा
शिवबा आमुचा
कर्दनकाळ मोगलांचा
रक्षक धर्म अन देशाचा
शिवबा आमुचा
शत्रू अन्यायाचा
न्याय गरीबांचा
शिवबा आमुचा
बुद्धिमंत, श्रीमंत
वीरांचाही वीर
शिवबा आमुचा
मातृभक्त, पितृभक्त
कुलवंत, शीलवंत
शिवबा आमुचा
कर्मयोगी, राजयोगी
प्रज्ञावंत, दयावंत
शिवबा आमुचा
सिंहाचा असे छावा
लढे गनिमी कावा
शिवबा आमुचा
गो-ब्राम्हण प्रतिपालक
हिंदवी स्वराज्याचा जनक
शिवबा आमुचा
जाहला छत्रपती
जाणता राजा
शिवबा आमुचा
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
================================================================



.jpg)
























कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा