बुधवार, २६ सप्टेंबर, २०१२

सुस्वागतम !!!


सुस्वागतम...!!!


नमस्कार, वाचक मित्रांनो !!! मी विश्वजीत दीपक गुडधे. वयाच्या १३ व्या वर्षापासून मी लेखन करीत आहे. याकरिता मी लेख, कथा, ललित, कविता, गझल, चारोळी यांसारख्या विविध साहित्यप्रकारांद्वारे अनेक विषयांवरील माझे मत, माझे विचार शब्दबद्ध करून इथे व्यक्त केले आहेत. माझे विचार इतरांपर्यंत पोहचावेत आणि त्यावर इतरांची मते जाणून घेता यावीत, जेणेकरून विचारांचे आदानप्रदान होवून माझ्या ज्ञानात नवी भर पडेल, यासाठी हा ब्लॉगप्रपंच. 


मला फेसबुकवर मिळालेल्या काही अविस्मरणीय प्रतिक्रिया

-----------------------------------------------------------------------------------------------------------------


१. महेंद्र लोमटे 

संमेलना मध्ये स्वताचा परिचय देण्याचा कार्यक्रम चालू असताना माईक एका उपस्थित असलेल्या महिले कडे आला '' नमस्कार , मी विश्वजीतची आई . आह्मी अमरावतीहून आलो आहोत . आणि प्रत्येक ठिकाणी मला विश्वजीतची आई म्हणून ओळखतात '' पुढचे शब्द थोडे तुटल्यासारखे झाले ,घस्या पर्यंत आलेला आवंढा प्रयासाने गिळून टाकला . हे सर्व सेकंदाच्या निम्म्याव्हून कमी वेळात झाले . आणि एक अभिमानाची नजर आपल्या पिल्ला कडे टाकून ती माउली पुढे बोलायला लागली . माझ्या अंगावर सर्कन काटा आला . पुढच्या बोलण्यातले माझे लक्ष उडाले आणि विश्वजित वर आले आणि मी त्याला त्याच्या न काळात वाचू लागलो . एवढ्या कमी वयात त्याच्या कडे आलेला समजूतदार पणा संयम आणि दुसरयाचे शांत पाने ऐकून घेण्याची विलक्षण हातोटी आणि या सर्वांच्या विरुद्ध त्याच्या डोळ्यात असणारे विलक्षण तेज . संध्याकाळी त्याच्या आई वडिलांशी मी गप्पा मारत असताना अमरावती महानगर पालिका कधी झाली या वर आमचे वेग वेगळे मते होती ते ९५ साली म्हणत होते आणि मी ९३ साली म्हणत होतोत . फक्त म्हणतच होतो आत्मविश्वास ० ० होता .विश्वजीत ने ते एकले व सहज सांगितले ८३ साली . एकदम कुल आत्मविश्वास . माझ्या मनाने हि ते उत्तर पक्के लौक करून टाकले .नंतर ते मी शोधायच्या हि भानगडीत पडलो नाही .आणि शोधणार हि नाही .कारण उत्तर वेगळे जरी असले तरी माझ्यासाठी ८३ च असेल .जे काही होणारे नुकसान असेल ते मी सोसायला तयार आहे . कारण उत्तर देताना त्याच्या डोळ्यातील चमकेला मी संमोहित झालो होतो .आणि आजही मला माझ्या अम्बेजीगैच्या नगरपालिकेच्या स्थापनेच्या सालची माहिती नाही . घरी आल्या नंतर'' ऋतू शब्दांचे '' उघडले व विश्वजीत च्या सर्व कविता वाचून काढल्या . व वाटले आपल्याला असे का सुचले नाही ? उत्तर हि लगेच मिळाले कि मी विश्वजीत नाही . तो एकमेव्द्वितीय आहे . आणि काल मी त्याचा एफ .बी वर मित्र झालो . वयाच्या ३७ वर्षी अभिमान वाटावा असे मित्र बनवणे खूप अवघड असते . पण विश्वजीत मुळे मला ते शक्य झाले .शाळेतील सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण नावाने ओळखत नसतो . त्यातील काही जणांना नावाने ओळखतो . पण मैत्री मात्र फार मोजक्याशी होते . आभारी आहे विश्वजीत मला मित्र केल्या बद्दल...

(दि. २२/०८/२०१२)

================================================================


२. राज कांदळगावकर

  
चित्र क्र. १  
(दि. ०३/०८/२०१२) 

चित्र क्र. २ 
(दि. ०७/०७/२०१२) 
================================================================

३. श्रीराम वाघमारे 
बेम्भाटे मास्तरांच्या शाळेचे स्नेह-संमेलन झाल्यानंतर मी काल्पनिक पुरस्कार जाहीर केलेची एक पोस्ट टाकली होती. त्यात मी तुला 'रिअल हिरो' असे संबोधून 'सर्वोत्कृष्ट नायक' हा पुरस्कार घोषित केला. हे सर्व पुरस्कार काल्पनिक असतील पण त्यामागच्या माझ्या भावना मात्र खऱ्या आहेत. तू खऱ्या अर्थाने एक फायटर आणि 'रिअल हिरो' आहेस. संमेलनाला आलेले सर्वच आकाशातील ताऱ्यांप्रमाणे चमकदार आणि तेजस्वी जरी असले तरी ते सर्व तुझ्या उपस्थितीने अगदी झाकोळून गेले. तुझ्या प्रतिभेपुढे मी स्वत:ला शून्य समजतो. एक मोठा गोल शून्य. तुझी गुणवत्ता, व्यासंग, वैचारिक पातळी, लेखन, समंजसपणा याबद्दल मी काही बोलण्याइतकी पात्रता खरच नाहीच माझी. लवकरच एक 'बाप' होणार आहे. आणि मी हीच प्रार्थना करीन कि माझ्याच काय तर सर्वांच्याच घरी एक 'विश्वजीत' जन्माला येवो. तुझा 'दादा' होणं हा देखील एक बहुमानच आहे. आणि तो मलादेखील मिळालाय. मी आधीच लिहिलेल्या या काही ओळी तुझ्यासाठीच कदाचित मला सुचल्या असतील. 


झालं गेलं सारं मला विसरायचंय..
मागे आता पुन्हा नाही परतायचंय..
स्वत:हून स्वत:लाच सावरायचंय..
दु:खाच्या आवेगाला आवरायचंय..
नव्या उमेदीने आता वावरायचंय..
झेप घेण्यासाठी पंख पसरायचंय..
कोण आपलं कोण परकं पडताळायचंय..
जिव्हाळ्याच्या नात्यांना घट्ट कवटाळायचंय..
एक नवं स्वप्नं आता पुन्हा पहायचंय..
सत्यात मग तेच मला साकारायचंय..
नव्या-नव्या रंगांनी चित्र रंगवायचंय..
कोमेजलेल्या मनाला पुन्हा फुलवायचंय..
आशेच्या किरणांनी आयुष्य सजवायचंय..
आव्हानांना सामोरे जात जीवन घडवायचंय..
मनेच नाही तर मला 'विश्व'च जिंकायचंय..
विश्व जिंकण्यासाठी तुला भरभरून शुभेच्छा..!!!
 (दि. २३/०८/२०१२)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
 संमेलनामध्ये जेव्हा जमेल तेव्हा मी तुझ्याशी बोलायचो. तुझ्या आई-बाबांशी पण मी बोललो. तुझा खूप अभिमान वाटतो रे. अगदी तुला सलाम ठोकावासा वाटला. तुझ्यासारखा मित्र मिळाला हा तर माझाच सन्मान आहे. संमेलनामध्ये अनेकांशी मैत्री झाली. पण खरे सांगू? तू जिंकून घेतलंस मला. तू थेट हृदयाला भीडलास. जातांना तुला मुद्दाम भेटलो नाही. कारण स्वत:ला सावरुच नसतो शकलो. मला खूप भरून आले असते. काय बोलू रे अजून? तुझाबद्दल बोलायला माझ्याकडे शब्दच नाहीत. नि:शब्द झालोय मी.
(दि. २३/०८/२०१२)
================================================================

४. प्रकाश रेडगावकर 
तू म्हणजे शब्दांचा जादुगार आहेस ..
किती सराईतपणे खेळतोस 
अगदी मस्त क्लिक करतोस 
प्रत्येक शब्द मग फोर, सिक्स
अगदी सचिन वाटतोस .
सचिन आज ना उद्या 
रिटायर होईल
मला नाही वाटत
तुझे कधी असे होईल
तू खेळत राहशील रे मित्रा 
मोठा होशील 
मग विसरणार नाहीस ना ..?
मला ,माझ्या शब्दांना ..???

(दि. २२/०८/२०१२)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

विश्वजित -मला ठाऊक आहे तू तो लंबे रेसका .....
हा अश्वमेघचा घोडा .सात समुद्र पार करणार .
तुला कोणीच अडवू शकणार नाही ..
रामाचा अश्व लव-कुशने अडवला 
पण तुझा अश्व अडवणारा मला तर कोठेच दिसत नाही..
मला दिसतेय तुझ्या वारुची लांब छलांग
(दि. २५/०८/२०१२)
================================================================


५. मिलिंद जोशी 

... म्हणूनच तर मी विश्वजीत सर म्हणतो. हे माझ्यापेक्षा वयाने लहान जरी असले तरी प्रतिभेने नक्कीच मोठे आहेत आणि त्यांच्याशी फेसबुकवर मैत्री केल्यावरच ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती.

(दि. २२/०८/२०१२)

================================================================


६. चंद्रकांत पागे 

अरे विश्वजीत... खूप कमी वयाचा असतानाच तुझ्यामध्ये जागेपण ऑलरेडी आलेलं आहे. सद्सदविवेकबुद्धी, सामाजिक बांधीलकीचं भान हे सारं सांभाळत असताना तू तुझ्या शालेय अभ्यासातही अव्वल आहेस हे विशेष अभिमानाची बाब. आणखी काय हवं असतं रे आईवडिलांना ? शिक्षकांना ? तू एक आदर्श मुलगा आहेस, आदर्श विद्यार्थी आहेस आणि देशाचा एक आदर्श नागरिकही आहेस. आजच्या तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुला भरभरून शुभेच्छा हे आदर्शपण टिकवण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी...!

(दि. ०३/०८/२०१२) 

================================================================


७. विलास वानखडे


विश्वजीत हो 

आहे जरी तुझे दोन्ही पाय अपंग 
फेसबुक मित्र आहेत तुझे संग 
सलाम आमचा तुझ्या प्रतिभेला 
आवडी साहित्य तुझे जनतेला 
चालत नसला तरी चालव कलम 
कलमच बनेल अपंगत्वावरचा मलम 
या वयातही तू लिहितोस गझल 
गझलसम्राटाची नाहीस दूर मजल 
साहित्यविश्व जिंकणारा तू विश्वजीत 
फेसबुकने तर तू होशील जगजीत 
तू गझलसम्राट हो, तू साहित्यसम्राट हो 
तू जगजीत हो, तू विश्वजीत हो

(दि.२९/०३/२०१२)
================================================================


८. प्रवीण कुळकर्णी


अरे तुमच्या सारख्या लोकांच्या प्रतिभेतच त्याच्या पाऊलखुणा आहेत. त्याला ते माहित आहे. तो फक्त त्या आमच्या सारख्या कोरड्या राहिलेल्या लोकांना दाखवत आहे. खूप सुंदर बाळा. 

(दि. ३१/०८/२०१२)

================================================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा